Ticker

6/recent/ticker-posts

अपर जिल्हाधिकारी मा. श्री. डॉ. रत्नदीप गायकवाड सर*तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर मॅडम*तालुका कृषी अधिकारी श्री.चंद्रकांत निमोड पेरू बागेला भेट


किनवट/  किनवट तालुक्यातील दरसांगवी (चि )येतील शेतकरी अरविंद माधव सुर्यवंशी यांच्या थेट शेतीमध्ये जाऊन जाऊन संवाद साधला *अपर जिल्हाधिकारी मा. श्री. डॉ. रत्नदीप गायकवाड सर*तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर मॅडम*तालुका कृषी अधिकारी श्री.चंद्रकांत निमोड   पेरू बागेला भेट


मौजे दरसांगवी येथे शेतकरी अरविंद सुर्यवंशी यांनी लावलेली पेरू बाग आज परिसरातील प्रगतशील शेतीचे उत्तम उदाहरण बनली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, योग्य व्यवस्थापन आणि उत्तम बाजारपेठेचा अभ्यास यांचे उत्तम मिश्रण त्यांच्या बागेत पाहायला मिळते. या पेरू बागेचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.


भेटीदरम्यान तहसीलदार मॅडम यांनी बागेतील झाडांची वाढ, ठिबक सिंचन व्यवस्था, सेंद्रिय खतांचा वापर, इतर अंतर पिके, मिश्र पिके, छाटणी पद्धती तसेच पेरू उत्पादनातील नाविन्यपूर्ण तंत्रांचा अभ्यासपूर्वक आढावा घेतला. लागवडी वेळेस पाण्याचे प्रमाण कमी असतानाही अरविंद सुर्यवंशी यांनी पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून बाग फुलवली आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


सुर्यवंशी यांनी  दिड एकर सेतीतुन 1500 पेरूच्या झाडांमधून 2 लाख 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले, तसेच मधामध्ये आंतरपीक  हारभरा भाजीपाला.सुद्धा घेतले त्यामध्ये सेंद्रिय खत वापरले.कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून शेतकरी आर्थिकदृरदृष्ट्या सक्षम होत असे दाखवून दिले 

तसेच.कीड-रोग व्यवस्थापनासाठी त्यांनी अवलंबलेली सेंद्रिय पद्धत, वेळोवेळी तज्ज्ञांचे कृषी विभाग, आत्मा, अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प प्रतिनिधी यांचे मार्गदर्शन आणि बाजारातील मागणी ओळखून पेरूची गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम शेती करण्याचा उपक्रम यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

बागेची उत्पादकता, झाडांची सुदृढ अवस्था आणि स्वच्छ परिसर पाहून तहसीलदार मॅडम प्रभावित झाल्या व इतर शेतकऱ्यांनीही अशाप्रकारे आधुनिक आणि सेंद्रिय शेती पद्धती अवलंबाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.


भेटीदरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री.चंद्रकांत निमोड तसेच इतर कृषी विभागातील अधिकारी , राष्ट्रविकास संस्थेचे गंगाधर घ्यार, रवी उबाळे, संदीप बेलकर, सुदर्शन गयाळ व इतर प्रतिनिधी होते, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

 उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचे आवाहन केले.


या भेटीमुळे अरविंद सूर्यवंशी यांना मोठा उत्साह मिळाला असून भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग करून बाग विकसित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तहसीलदार मॅडम यांची भेट स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड