Ticker

6/recent/ticker-posts

आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते मौजे लांजी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

 


मौजे लांजी राज्यात पहिला क्रमांक अनेलच 

आमदार भीमराव केराम यांचे प्रतिपादन

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यात विकास कामासह सर्व प्रकारचे शासकीय उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेली मौजे लांजी ग्रामपंचायत येथे आमदार भीमराव केराम यांच्या निधीतून विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी आमदार भीमराव केराम यांनी कामे दर्जेदार करा आणखी विकास निधी देतो तक्रारींना घाबरू नका शासन तुमच्यासोबत आहे शासन निकषात पात्रतेची चिन्हे दिसत असून ग्रामपंचायतचा नक्कीच राज्यात पहिला क्रमांक येईल असे आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली



दि 12 रोजी पार पडलेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार भीमराव केराम हे लांजी येथे आले होते यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार भीमराव केराम होते तर प्रमुख उपस्थितात तहसीलदार अभिजीत जगताप गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच मारोती बंडू रेकुलवार प्रमुख उपस्थित होते यावेळी डॉ राजेश माचेवार गटशिक्षणअधिकारी संतोष शेटकार डॉ साबळे गोवर्धन मुंडे संजय राठोड डॉ निरंजन केशवे आनंद मच्छेवार वी आ लोखंडे म आ योगिता राठोड सी पी बाबर अनिल वाघमारे गोपू महामुने जगणं गेडाम शिवचरण जाधव बालाजी पवार गोविंद मगरे पाटील यांचे सह मान्यवर उपस्थित होते



यावेळी आमदार भीमराव केराम यांचे हस्ते माँ जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रकाश जाधव यांच्या घरापासून अर्जुन पवार यांच्या शेतापर्यंत एक किलोमीटर खडकीकरण पांदन रस्ता तसेच चिरडे यांच्या शेतापासून केशव पोपुलवार यांच्या शेतापर्यंत एक किलोमीटर  पांदण रस्त्याचे खडकीकरण मग्रारोहयो अंतर्गत सहा कामांचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीवी कॅमेरे तसेच सोलार पॅनल इन्वर्टर बॅटरी सह तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आर ओ वॉटर फिल्टर एटीएम तसेच गावाला लागून असलेल्या स्मशान भूमी बांधकाम नरेगा अंतर्गत जलतारा योजनेचे उद्घाटन तसेच गावासह बायपास रस्त्यावर रस्त्यालगत वृक्षारोपण अपंगांना मदत धनादेशाचे वितरण यासह विविध विकास कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले 


यावेळी श्रीमती साधना तावडे ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती लिलाबाई जाधव उपसरपंच सौ कोमल जाधव सदस्य सौ बबीता पवार सदस्य रवी पवार सदस्य संतोष कमटेवार सदस्य यांचे सह मान्यवर उपस्थित होते

Breaking News

आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते मौजे लांजी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन