श्रीक्षेत्र माहूर
माहुर शहरासह तालुक्यात अवैध वाळू तस्करीला अचानक पणे उत आला असून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चित्रीकरण करीत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य सदानंद पुरी यांना वाळू तस्करांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल संच फोडल्याची घटना दि 12 .2 2026 रोजी. रात्री 9-45 वाजताचे सुमारास घडली या प्रकरणी पत्रकार सदानंद पुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळू तस्करां विरोधात माहुर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या घटनेने माहुर शहरासह तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत जनतेतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पत्रकार सदानंद पुरी हे दि 12 2 2026 रोजी रात्री 9-45 वाजता घराकडे जात असतांना शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैधरित्या वाळू तस्करी करणारे वाहन दिसताच पत्रकार सदानंद पुरी यांनी आपल्या मोबाईलमध्ये सदर वाहनाचे चित्रीकरण केले. वाहन चालकाने
याबाबतची माहिती टिप्पर मालकास दूरध्वनीवरून दिली.असता टिप्पर चालक व त्याच्या साथीदारांनी तक्रारदारास रस्त्यात अडवून टिप्परचे फोटो का काढले अशी विचारणा करुन वाद घालत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करुन वाद घातला या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले एवढ्यावरच न थांबता तक्रारदाराच्या हातातील मोबाईल हिसकावून जमीनीवर आदळुन फोडला यामध्ये तक्रारदाराचे 23000 रुपयाचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेनंतर पत्रकार सदानंद पुरी यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरुन माहुर पोलीसांनी चारआरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा करण्यात आला असून याप्रकरणाचा पुढील तपास पो ना सत्यपाल मडावी हे करित आहेत.
.......................................................
एकीकडे सिंदखेड पोलीस एका विशिष्ट समाजाच्या वाळूतस्करावर हेतू तडीपरीचे आदेश काढून तडीपार करतात तर दुसरीकडे माहूर पोलीस ठाणे सिंदखेड पोलीस ठाणे यासह तहसील कार्यालयात या आरोपी विरोधात अनेक गुन्हे कारवाया दाखल असल्याची चर्चा असून यांच्यावर माहूर पोलीस ठाणे तडीपारिची कारवाई का करत नाही हे न उघडणारे कोडे असून एका नेत्याच्या भरोशावर सदरील आरोपी हा मी माहूर तालुक्याचा वाल्मीक कराड असल्याचे सर्वा समोर सांगून छाती बडवत असताना त्याचे वर कारवाई होत नाही तसेच एक वाळू तस्कर फेसबुक वर एका नगरसेवकाला टॅग करून पत्रकाराबद्दल धमकी वजा आक्षेपार्य लिखाण लिहून टेंभा मिरवतो आणि हे सर्व महसूल पोलीस विभागातला माहीत आहे परिणामी एखाद्या पत्रकाराचा रात्रीला चित्रीकरण करताना जीवास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांचे वर तत्काळ तडीपारीची कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी होत आहे
