Ticker

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनानिमित्त डोंगरगाव तांडा येथे दुर्गा फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 


*आरोग्यम् धनसंपदा*

किनवट  प्रतिनिधी दि.२७ : किनवट तालुक्यातील डोंगरगाव तांडा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दुर्गा फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “आरोग्यम् धनसंपदा” या ब्रीदवाक्याला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



या मोफत आरोग्य शिबिरामार्फत १०७ हून अधिक गावकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, ताप, सर्दी-खोकला तसेच प्राथमिक उपचार व आवश्यक सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.


या शिबिरात डॉ. चेतन दराडे, डॉ. रवी जाधव, डॉ. वैष्णवी पद्मावार यांनी वैद्यकीय सेवा देत रुग्णांची तपासणी केली. त्यांच्या सोबत चंद्रसिंगजी साबळे, अक्षय पावडे, बालाजी तोटेवार, शिक्षक प्रदीप धुतमल, नागनाथ सूर्यवंशी, साक्षी हसबे यांच्यासह दुर्गा फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


दुर्गा फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोयर व उपाध्यक्ष दुर्गा भोयर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत, ग्रामीण भागातील आरोग्य विषयक गरजा लक्षात घेऊन भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.


या आरोग्य शिबिरामुळे डोंगरगाव तांडा येथील नागरिकांना वेळेवर तपासणी, योग्य सल्ला व आरोग्याबाबत जनजागृती मिळाल्याने दुर्गा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Breaking News

समाजभान जपणारा पत्रकार: राजेश्‍वर कांबळे