दि. 16 मार्च ता.प्र.
किनवट तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील हनुमान मंदिरात मारोतराव पाटील सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. शेती व्यवसाया समोर असलेल्या अनंत अडचणीचा पाढा यावेळी ग्रामस्थांकडून वाचण्यात आला. मारुती खंडू वावधाने या शेतकऱ्याने शेतकरी लुटीचा अनेक घटना सांगून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. माझ्या पंधरवड्यात झालेल्या वादळी वाऱ्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांची मका जमीनदोस्त झाली असून किनवट तालुका प्रशासनाने शून्य नुकसानीचा अन्यायकारक अहवाल पाठवला असल्याचा खेद व्यक्त केला. जातीपातीच्या राजकारणात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आता संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही, असा सूर या बैठकीतून निघाला.
शाखाध्यक्ष प्रकाश रुद्राजी मेंढे, उपाध्यक्ष वासुदेव बाबुराव वागतकर, सचिव क्षीरसागर मोतीराम हूरदूके, तर सदस्य म्हणून दीपक कोंडीबा झाडे, सतीश विठ्ठल वागतकर, कैलास आनंदराव धुमाळे, सुभाष रावजी धुमाळे, अरविंद माधव बुरकुले, विलास रामू मेंढे, रामकिशन अर्जुन मेंढे, माधव मुंजाजी ढोले, ज्ञानेश्वर नारायण खारोडे, कैलास तुकाराम मेंडके, मारोतराव नारायण पाटील सोळंके, संतोष आनंदराव धुमाळे, कपिल रामा डाके, बाबुराव रावजी धुमाळे, बाबुराव गुणाजी वागतकर, मारुती खंडू वावधाने, दिगंबर महादेव धुमाळे, परमेश्वर मारुती हुरदूके, देवजी जयवंत ढोले अशी कार्यकारणी निवडण्यात आली.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी संघटित शक्तीचे बळ समजावून सांगत वीस तारखेच्या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. या बैठकीस थारा शाखेचे प्रतिनिधी म्हणून भगवान पाटील गोपगेनवार, आत्माराम बस्सी, युवराज जाटवे यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संघटनेची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
