Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय समितीवर प्रा. सुनिल व्यवहारे यांची निवड

 


किनवट / राजेश पाटील:

 महाराष्ट्र शासनाच्या "राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना" अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी नांदेड जिल्हास्तरीय निवड समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीवर सरस्वती विद्या मंदिर वरिष्ठ महाविद्यालय, किनवट येथील प्रा. डॉ. सुनील व्यवहारे यांची कलाकार सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना शासनाच्या मानधन योजनेचा लाभ पारदर्शक आणि योग्य पद्धतीने मिळावा, यासाठी समिती कार्य करणार आहे. कलाकार व साहित्यिकांना या योजनेचा लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.


विविध स्तरांतून व्यवहारे यांचे अभिनंदन


नांदेड जिल्ह्यातील विविध मान्यवर साहित्यिक व कलाकारांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. किनवट-माहूर तालुक्यातून प्रा. डॉ. सुनील व्यवहारे यांची कलाकार सदस्य म्हणून निवड झाल्याने तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.


सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.


त्यांच्या निवडीबद्दल आ. भीमराव केराम, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, डॉ. अशोक बेलखोडे, प्रा. रामप्रसाद त्यौर, प्रा. डॉ. आनंद भालेराव, प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्यासह विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा परिषद नांदेडच्या ग्रामपंचायत विभागामार्फत या संदर्भातील आदेश २ मार्च रोजी जारी करण्यात आला असून समितीचा कार्यकाळ शासन निर्णयानुसार राहणार आहे

Breaking News

जिल्हास्तरीय समितीवर प्रा. सुनिल व्यवहारे यांची निवड