Ticker

6/recent/ticker-posts

गोठ्यात हातभट्टी दारू काढणाऱ्यावर पोलिसांची धाड हजारो रुपयांचे दारू काढण्याचे साहित्य नष्ट माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी येथील प्रकार

 


श्रीक्षेत्र माहूर 

माहूर तालुक्यातील अती दुर्गम तसेच पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या मौजे हिंगणी येथे घराला लागून असलेल्या गोठ्यात हातभट्टी दारू काढण्याचा प्रयत्नात असलेल्या नागरिकास पोलीस निरीक्षक देविदास चोपडेयांनी स्वतः रंगेहात पकडून मोह फुलाचे बनविलेले रसायन आणि ईतर घातक केमिकल नष्ट करण्यात आल्याची घटना दि 8 रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे


पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या ऑपरेशन फ्लॅश आऊट तसेच पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या दारू विक्री विरोधात सुरू असलेल्या मोहिमे अंतर्गत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे ॲक्शन मोडवर असून माहिती मिळतात त्यांनी धडक कारवाया सुरू केल्या असून गेल्या आठवड्यात तीन ठिकाणी धाडी टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून अनेकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत


मौजे हिंगणी येथे घराला लागून असलेल्या गोठ्यात एक इसम हातभट्टीची दारू काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचे सह पोहेका प्रशांत भोपळे पोका पवन राऊत होमगार्ड उमेश भगत खुशवंत वर्मा यांचे सह पोलिसांनी गोठ्यात धाड टाकत दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करून हातभट्टीची दारू  काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अवैध दारू विक्री आणि हातभट्टी दारू काढणाऱ्या नागरिकाचे गावकऱ्यांनी  समुपदेशन करावे न ऐकल्यास दारू विक्रेत्याविरुद्ध पोलिसात तत्काळ खबर देण्याचे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी उपस्थित गावकऱ्यांना केले

Breaking News

जिल्हास्तरीय समितीवर प्रा. सुनिल व्यवहारे यांची निवड