किनवट / प्रतिनिधी: तालुक्यातील गोकुंदा येथे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तमन्ना ब्युटी पार्लर व जीवनरेखा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका परवीन शेख मॅडम यांच्या वतीने येत्या 29 मार्च रोजी दुसऱ्यांदा भव्य मेहंदी कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. रमजान व महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून परिसरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या स्पर्धेमध्ये विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक 5000 रुपये, द्वितीय पारितोषिक 3000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 1500 रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच 10 उत्तेजनार्थ पारितोषिके, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्याला “किनवट मेहंदी क्वीन” हा मानाचा किताब देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून
किनवट-माहूर मतदारसंघाचे आमदार केराम साहेब
हिंगोली मतदारसंघाचे खासदार मा. नागेश पाटील आष्टीकर साहेब
नगरपालिका नगराध्यक्ष सुजाताई येंद्रलवार
युवा नेते करण भाऊ येंद्रलवार
आदिलाबाद फेमस मेकअप आर्टिस्ट नुरी खान
आदिलाबाद फेमस मेकअप आर्टिस्ट नाझिया फरीन
मेकअप आर्टिस्ट पूनम
अन्याय अत्याचार निर्मूलन समिती मराठवाडा अध्यक्ष डॉ. प्रियंका राठोड सत्य निर्मिती महिला मंडळाचे अध्यक्ष शबाना खान मुंबई
पुरोगामी पत्रकार संघटना राज्याचे उपाध्यक्ष ठाकूर साहेब व शिखारे साहेब
हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी परिसरातील महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक परवीन शेख मॅडम यांनी केले आहे.
नोंदणी ठिकाण :
तमन्ना ब्युटी पार्लर, ठाकरे चौक, गोकुंदा संपर्क 9921986511
