Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त 'नवरत्नांचा' गौरव आणि मोफत आरोग्य शिबीर


 किनवट (प्रतिनिधी): भारत जोडो युवा अकादमी संचलित, साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज  दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी 10.00 वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ कर्तबगार महिलांचा (नवरत्नांचा) गौरव करण्यात आला आहे.

महिलांच्या आरोग्याप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी एम.आय.डी.सी. नांदेड रोडवरील साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हे भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात  उपस्थित सर्व महिलांची डॉ. दुर्गा काकडे, डॉ. विद्या गोलकोंडावार, डॉ. रुतुजा चाडावार, डॉ. वैष्णवी पदमावार, यांनी विनामूल्य आरोग्य तपासणी केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भाग्यश्री बेलखोडे - वरटकर यांनी केले.

केवळ आरोग्यच नव्हे, किनवट या आदिवासी भागातील समाजाच्या विविध स्तरांत आपल्या कतृत्वाने ठसा उमटवणाऱ्या महिलांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. यामध्ये कांताबाई कांबळे - अंगणवाडी सेविका, ललिता वाघमारे - अंगणवाडी मदतनीस, अर्चना गुडसेवार - आशा वर्कर, सुनंदा नामदेव येसंबरे - आरोग्य सेविका,  लक्ष्मीबाई कोटनाक -बचतगट प्रतिनिधी,  बी. एम. मडावी आरोग्य पर्यवेक्षिका, पुण्यरथा उमरे - तामगाडगे - शिक्षिका, सुनिता आत्राम - महिला सरपंच व शिवलिला  घूले -कर्तबगार महिला अशा एकूण ९ महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. शाल सन्मान चिन्ह,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी श्री. के.पी. गायकवाड यांनी केले तर मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. सुनंदा घडसिंग, डॉ. वंदना पत्की, डॉ. भाग्यश्री बेलखोडे, डॉ. योगेंद्र वरटकर  हे उपस्थित होते. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. दुर्गा काकडे व वंदनाताई उईके यांनी केले तर नेहा गिते यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी भारत जोडो युवा अकादमी व साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे पर्यवेक्षक बाबासाहेब सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Breaking News

जिल्हास्तरीय समितीवर प्रा. सुनिल व्यवहारे यांची निवड