Ticker

6/recent/ticker-posts

विधीसंघर्षिता कडून बनावट नोटा जप्त विधी संघर्षिताच्या वडिलांना अटक उर्सात बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला

 


श्रीक्षेत्र माहूर 


शहरातील सोनापिर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेदरम्यान विधी संघर्षितांकडून बनावट नोटां चालविण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून माहूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण १९ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी एका व्यक्तीस ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी एका विधिसंघर्षित अल्पवयीन मुलाचा सहभागही समोर आल्याने खळबळ उडाली आहे 


मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास माहूर पोलीस स्टेशनचे पोका संग्राम पवार, पो.कॉ.गजानन जाधव व पोकॉ राठोड हे सोनापिर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेत पायी पेट्रोलिंग करत होते. यावेळी क्रॉस झुल्याजवळील तिकीट काऊंटरवरील महिलेने एका मुलाकडून बनावट नोट देऊन तिकीट घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.


यावरून पोलिसांनी तत्काळ त्या मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने  माहूर वार्ड क्र. ७, येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ६ बनावट भारतीय चलनी नोटा, एकूण ३ हजार रुपये मिळून आले.


पुढील चौकशीत या नोटा त्याच्या आत्याचे पती यांच्या घरातून आणल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशावरून पोलिसांनी पंचांसमक्ष घराची झडती घेतली. यावेळी घरातील रॅकमधील कपड्याखाली ५०० रुपयांच्या ३३ बनावट नोटा, एकूण १६ हजार ५०० रुपये किंमतीच्या नोटा आढळून आल्या.

पोलिसांनी पंचनामा करून सर्व बनावट नोटा जप्त केल्या असून एकूण ३९ बनावट नोटा १९,५०० रुपये हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १७९ व १८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचा मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके पोहेका लक्ष्मण मेश्राम पोका संग्राम पवार पोका संघरत्न सोनसाळे होमगार्ड शेख गणी दिलीप जाधव पंकज मुरकुटे उमेश भगत एस पी भगत करत आहेत

Breaking News

विधीसंघर्षिता कडून बनावट नोटा जप्त विधी संघर्षिताच्या वडिलांना अटक       उर्सात बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला