Ticker

6/recent/ticker-posts

अडीचशेवर लाभार्थ्यांच्या अनुदानाचे निराकरण

 


श्रीक्षेत्र माहूर

माहूरच्या तहसील कार्यालयात दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी मागील दोन ते तीन वर्षाचे अनुदान लाभार्थी यांना मिळाले नसल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसील कार्यालय, माहूर येथे तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कॅम्प घेण्यात आला. सदर कॅम्पमध्ये 210 लाभार्थी उपस्थित होते. 150 लाभार्थी यांचे पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुल होते मात्र लाभार्थी यांना कोणत्या बँक खात्यावर जमा झाले हे माहित नसल्याने त्यांना अनुदान कोणत्या खात्यावर जमा झाले हे या कॅम्पमध्ये सांगण्यात आले. 

तालुक्यातील 51 लाभार्थ्यांच्या सन 2022, 2023, 2024 व 2025 या वर्षाच्या अनुदानासंबंधी तक्रारी होत्या. सदर तक्रारी पैकी तहसील स्तरावरील तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यात आले आहे तर 03 तक्रारींमध्ये ई केवायसी झाली परंतु अनुदान जमा झाले नाही त्यामध्ये ई पंचनामा पोर्टलवर पाठपुरावा करण्यात येणार आहे. याच कॅम्पमध्ये 10 ई केवायसी प्रलंबित लाभार्थ्यांचे ई केवायसी करण्यात आले व 03 लाभार्थ्यांच्या ग्रिव्हन्स दाखल करण्यात आल्या आहेत. आज रोजी अनुदानासंबंधी प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा अनुदान खात्यात पडेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल असे नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले. तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्कात राहुन अद्यावत माहिती घ्यावी अशी विनंती लाभार्थ्यांना करण्यात आली.



सदर विशेष कॅम्प जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहायक जिल्हाधिकारी. जेनित चंद्रा दोंतुला यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असुन कॅम्पच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार अभिजीत जगताप कैलास जेठे नायब तहसीलदार नैसर्गिक आपत्ती विभाग, सहायक महसूल अधिकारी नैसर्गिक आपत्ती विभाग सिध्दार्थ कुलदिपके, सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालयातील शिपाई यांनी परीश्रम घेतले.

Breaking News

अडीचशेवर लाभार्थ्यांच्या अनुदानाचे निराकरण