Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुकास्तरीय स्पर्धेत जि.प. प्रा. शा. गोंडखेडीच्या विद्यार्थिनीचे यश*

 


किनवट : तालुकास्तरीय शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित पाढे पाठांतर स्पर्धेत जि.प. प्राथमिक शाळा, गोंडखेडी येथील विद्यार्थिनी कु. आमृता नानंगसिंग साबळे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. आमृता हिने १ ते ४१ पर्यंतचे पाढे अचूकपणे पाठांतर करून उत्कृष्ट कामगिरी केली.


या यशामागे  शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर दहिफळे सर व सहशिक्षक श्री सतिश नालमवार सर यांनी विद्यार्थ्यांकडून दररोज पाढ्यांचा सराव करून घेतल्यामुळे विद्यार्थिनीला हे यश मिळवता आले.  तसेच किनवट तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी  श्री अनिलकुमार महामुने साहेब तसेच धानोरा बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख आणि केंद्रिय मु .अ .यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.


विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी श्री अनिलकुमार महामुने साहेब यांच्या हस्ते तिला तालुकास्तरीय स्पर्धेत प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिग्रस (चंद्रपूर) ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री कर्तार साबळे तसेच ग्रामसेवक श्री अनिल शिंदे यांनीही कु. आमृता हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


या यशामुळे जि.प. प्रा. शा. गोंडखेडी तसेच संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Breaking News

येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र नवरात्र महोत्सव व श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार