Ticker

6/recent/ticker-posts

उच्च माध्यमिक परिक्षे पाठोपाठ शालांत परिक्षेच्या निकालातही येथिल सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम

किनवट ( )
उच्च माध्यमिक परिक्षे पाठोपाठ शालांत परिक्षेच्या निकालातही येथिल सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे . या शाळेचा सेमी इंग्रजीचा100 टक्के तर मराठी माध्यमाचा 91 टक्के निकाल लागला असून08 विद्यार्थी90 टक्के पेक्षा जास्त तर 30 विद्यार्थी 80 टके पेक्षा जास्त गुण घेवून विशेष प्राविन्य प्राप्त ठरले आहे . शाळेच्या गुणवत्तेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .
शालांत परिक्षेचा निकाल13 मे रोजी दुपारी 1 : 00 वाजता घोषीत झाला असुन किनवट येथिल सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . शाळेचा सेमी इंग्रजीचा निकाल100 टक्के लागला तर मराठी माध्यमाचा 91 टक्के निकाल लागला आहे . सेमी इंग्रजी व मराठी माध्यमातून एकून213 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती
पैकी196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे 08 विद्यार्थ्यांनी90 टक्के च्या वर तर 30 विद्यार्थ्यांनी80 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे शाळेतून97.80 टक्के गुण घेऊन देशपांडे अक्षरा आशिष हिने प्रथम येण्याचा मान पटकावला 95 टक्के गुण घेऊन पत्की अदिश्री गिरीष व्दितीय 93.60 टक्के गुण प्राप्त करुण पानपट्टे उदयकिरण विशाल तृतिय 93 टक्के गुण घेवून भटकर निरजा मंगेश व नेम्मानीवार गौरी साईनाथ चतुर्थ92.60 टक्के गुण घेवून भालके समृद्धी शत्रुघन या विद्यार्थीनिने पाचवा क्रमांक पटकाविला आहे  शाळेच्या गुणवत्ते बद्दल तसेच यशवंत विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार मुख्याद्यापक कृष्णकुमार नेमानीवार पर्यवेक्षक संजय चव्हाण  सर्व शिक्षक वृंद तसेच पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे

Breaking News

कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!*