Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगाने अर्धनग्न भिक मागो आंदोलनात सहभागी व्हा- चंपतराव डाकोरे


 *खासदार अजित गोपछेडे खा.रविद्र चव्हाण आ. प्रतापराव पाटिल चिखलिकर यांच्या घरासमोर दि.३ऑगस्ट २०२५ रोजी  दिव्यांगाने अर्धनग्न भिक मागो आंदोलनात सहभागी व्हा राहुल साळवे, चंपतराव डाकोरे पाटिल यांचे आव्हान*


खासदार आमदाराना जागे करण्यासाठी दिव्यांग आंदोलनाचा तिसऱ्या टप्प्यात खा.अजित गोपझेडे,खा.रविद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दिव्यांग  बांधवाचा  निधी खर्च केला काय..?

दिव्यांगांसाठी आपण आवाज उठवला काय...? यांचा जाब विचारण्यासाठी आंदोलन


नांदेड प्रतिनिधी : 

खासदार, यांच्या कडील एम्पीलैड्स मधील दिव्यांगांचा राखीव निधी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गतचा दिव्यांगांच्या हक्काचा राखीव निधी दरवर्षी खर्च करण्यात यावे

म्हणून बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती, दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्राच्या वतीने सकल दिव्यांग संघटनां  सन २०१६ पासुन ते आजवर निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुनही अद्याप तो निधी खर्च केला जात नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यासह सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक १५ जुन २०२५ पासुन नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढुन भिक मागो आंदोलनासह विविध तिव्र स्वरूपाचे आंदोलने करण्यास सुरुवात पहिल्या टपा दि.१५ जुनं २०२५ रोजी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजय चव्हाण, आमदार राजेश पवार दुसरा टप्पा आमदार हेमंत पाटिल, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी 

दिव्यांगानी अर्धंनग्नअवस्थेत भिक मांगो आंदोलन केले असता आमदार निवेदन घेऊन निधी देण्याचे आश्वासन दिले.

दि.९ जुलै २०२५ रोजी भर पावसात दिव्यांगानी गनिमी काव्याने मंत्रालय अधिवेशनात घुसण्याचा प्रयत्न करुन लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे लक्ष केंद्रित केले.

      आता तिसऱ्या टप्प्यात दि.३ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दिव्यांग अनेक प्रकारच्या आंदोलनात का.अजित गोपझडे,का.रविद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनासह विविध तिव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येणार आहे तसेच आपण दिव्यांगांचा निधी खर्च केला काय..? दिव्यांगांसाठी आपण आवाज उठवला काय...? असे म्हणत जाब विचारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासन नियोजन विभागाचे दिनांक १२ जुलै २०१६ आणि दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ अन्वये हा निधी खर्च करणे अपेक्षित होते परंतु अद्याप खर्च न करता तो निधी इतरत्र वळविला असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना राबविल्या जातात परंतु स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याचे म्हणत नांदेड शहरातील शेकडो दिव्यांगांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील, व्यंकट कदम, प्रदिप हणवते, शिवराज बंगरवार,शिवाजी सुर्यवंशी, नागनाथ कामजळगे, हणमंतराव राऊत,पिंटु राजेगोरे, सुनिल जाधव,शेख खालेद,रवि कोकरे, कार्तिक कुमार भरतिपुरम, नागेश निरडी, सय्यद आतिक, शेख ऊमर,लक्ष्मिकांत जाधव, सय्यद आरिफ, प्रशांत हणमंते, शेख आलीम, शेख रहिम, मोहसिन खान, परमेश्वर आकाडे,अजय गोरे,शेख माजीद, सईद मौलाना वैद्य,थोरकर, नारायण तांडलवार, शेषेराव वाघमारे, शेख सुफियान,मसुद मुलाजी,राजू इराबत्तीन,शेख मतीन, शेख गौस, सुनिल कांबळे, रमेश लंकाढाई,भाग्यश्री नागेश्वर, सविता गवते, कल्पना सकते, अफरोजा खानम, शैख जैनाज यासह मुकबधीर कर्णबधिर, अंध सकल दिव्यांग संघटनांनी केले आहे असे प्रसिध्दी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिले

Breaking News

अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी एक लाख रुपये द्या      माहूर तालुका ए आय एम आय एम कडून तहसीलदारांना निवेदन