Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील पहिले खासदार अजित गोपछडे यांनी दिव्यांगाचा तिस लाख रुपये निधी देऊन दिला आधार


सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील आमदार, खासदार यांच्या कडे दिव्यांचा साठी दरवर्षी तिस लाख रू निधी मिळावा म्हणून दि.१५ जुनं ते ३१ मार्च २०२५ पर्यंत आमदार, खासदार यांच्या निवासस्थानी दिव्यांगाचे अर्धं नग्न अवस्थेत भिक मागो आंदोलन माजी. मुख्यमंत्री , खा.अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी सुरूवात करून आतापर्यंत आठ लोक प्रतिनिधीच्या निवासस्थानी आंदोलन केले असता फक्त आश्वासन मिळाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुध्दा निधीचे पत्र दिले नाहि पण चौथ्या टप्प्यातील खा.अजित गोपछडे यांनी दिड तास दिव्यांगाच्या आंदोलनात प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून तिस लाखांचा निधीचे जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र दिले ते महाराष्ट्रातील पहिले खासदार आहेत यांचा आदर्श सर्व आमदार खासदारांनी घेऊन निधी द्यावा नसेल तर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला*


नांदेड प्रतिनिधी :

बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति समिती नांदेड व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र व सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांगानि स्वबळावर जगता यावे म्हणून आमदार, खासदार त्यांच्या मतदार संघातील दिव्यांगाना दरवर्षी तिस लाख रुपये निधीची तरतूद दिव्यांग कायदा २०१६ असुन ते निधी आमदार, खासदार देत नसल्यामुळे शासन प्रशासनास जागे करण्यासाठी अनेक निवेदने, मोर्चे, आंदोलन करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधी खासदार, आमदार यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दि.१५ जुनं ते ३१ मार्च २०२६ पर्यंत अनेक प्रकारचे आंदोलन करण्यास सुरुवात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी दि.१५ जुनं २०२५ ला पहिला टप्पा, सुरूवात करून तिनं खासदार पाच आमदार यांच्या निवासस्थानी दिव्यांगानी आंदोलन करून लक्ष केंद्रित केले असता आठ पैकी चौथ्या टप्प्यातील अजित गोपछडे यांनी





महाराष्ट्रातील पहिला खासदार दिव्यांगासाठी असलेला निधी तात्काळ आंदोलन स्थळी जिल्हाधिकारी नांदेड यांना फोन करुन लेखी पत्राद्वारे घोषणा केली. चौथ्या टप्यात आंदोलनाला यश मिळाले हे यश संघटित संघर्षात सहभागी असलेल्या दिव्यांगाचे व त्यांच्या संघर्षाला यश मिळावे म्हणुन कुंभकर्ण जागे करण्यासाठी प्रयत्न केलेले सर्व शोषल मिडिया ,प्रिंट मिडिया,चॉनल मिडिया ने केलेल्या प्रसिध्दी मुळे महाराष्ट्रातील पहिला जिल्हा नांदेडच्या दिव्यांगाना न्याय हक्क मिळाला .

 महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदारांनी नांदेड जिल्ह्यातील खा.अजित गोपछडे साहेबांचा आदर्श घेऊन दिव्यांगाचा आमदार, खासदार द्यावा नाहि दिल्यास सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भर मिव्र आंदोलन करण्यात येईल 

हि वेळ येऊ देऊ नये.

       खासदार , आमदार यांच्या निवासस्थानी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्रच्या वतीने चौथ्या टप्प्यातील आंदोलन  दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी खासदार डॉ.अजित गोपछडे, खासदार प्रा.रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर अर्ध नग्न अवस्थेत भिक मागून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व राहुल साळवे, चंपतराव डाकोरे पाटिल, आदित्य पाटिल,व्यंकट कदम, प्रदिप हणवते, शिवराज बंगरवार,शिवाजी सुर्यवंशी, नागनाथ कामजळगे, हणमंतराव राऊत,पिंटु राजेगोरे, सुनिल जाधव,शेख खालेद,रवि कोकरे, कार्तिक कुमार भरतिपुरम, नागेश निरडी, सय्यद आतिक, शेख ऊमर,लक्ष्मिकांत जाधव, सय्यद आरिफ, प्रशांत हणमंते, शेख आलीम, शेख रहिम, मोहसिन खान, परमेश्वर आकाडे,अजय गोरे,शेख माजीद, सईद मौलाना वैद्य,थोरकर, नारायण तांडलवार, शेषेराव वाघमारे, शेख सुफियान,मसुद मुलाजी,राजू इराबत्तीन,शेख मतीन, शेख गौस, सुनिल कांबळे, रमेश लंकाढाई,भाग्यश्री नागेश्वर, सविता गवते, कल्पना सकते, अफरोजा खानम, शैख जैनाज यासह मुकबधीर कर्णबधिर, अंध सकल दिव्यांग संघटनांनी केले आहे असे प्रसिध्दी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिले

Breaking News

अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी एक लाख रुपये द्या      माहूर तालुका ए आय एम आय एम कडून तहसीलदारांना निवेदन