श्रीक्षेत्र माहूर
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे उद्योग- संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने दि 8 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी उद्घाटन करण्यात आले. यावेळी प.पू.श्री. योगीबापू श्यामजी भारती महाराज तहसीलदार अभिजीत जगताप यांची उपस्थिती होती
यावेळी सपोउपनि बी एन जाधव माहूर आय एम सी सदस्य संजय सुरोशे, सतीश कान्नव युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, जयकुमार अडकिने, सय्यद ईसा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगितली, तुम्ही फक्त प्रमाणपत्रासाठी शिक्षण घेऊ नका तर एक सक्षम बना, तुमचे कौशल्य दाखवा यासाठीच शासनाने नवीन युवा पिढीला एक संधी म्हणून या नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली. कार्यक्रमादरम्यान राज्यसभा खासदार मा. अशोकराव चव्हाण यांनी शुभेच्छा संदेश पाठविला असता कर्मचारी एन.बी. चिरडे यांनी मान्यवर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी वृंद यांच्यासमोर त्यांनी वाचून दाखविला.
पी एम विश्वकर्मा लाभार्थी दीपक भगवान मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पीएम विश्वकर्मा लाभार्थी दीपक मुंडे यांनी विश्वकर्मा योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगितली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य फारुकी ए. वासे यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या प्र. गटणीदेशीका कु. ए.एन. पोतदार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. के. जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशिका ए. एन. पोतदार यांनी केले. यावेळी कु. के. पि. वाकोडे कु. ए. एल. रामटेके श्री. आर. वी ठमके, कु. पि. एल. बुटले, श्री. एस. एस. डाखोरे, श्री. यू. डी, चव्हाण, कु. व्ही. डि मानकर, श्री. एम. आर. मेकलवार, कु. कुसुम मेशेकर, कु. रागिणी मेटेकर, व मेस्को सुरक्षा रक्षक श्री. आर. डि. देशमुख,श्री. व्ही. पवार, श्री ए. बि. ठाकरे, श्री. बि. जि. मुंडे, यांचे सह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते

