Ticker

6/recent/ticker-posts

“आनंदाचा शिधा” योजना कायम चालू ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !


श्रीक्षेत्र माहूर


महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली “आनंदाचा शिधा” योजना राज्यातील गरीब व गरजू नागरिकांसाठी सणासुदीच्या काळात मोठा आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत फक्त १०० रुपयांमध्ये सूजी, साखर, डाळ, तेल यांसारख्या अत्यावश्यक वस्तू मिळत असल्याने हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला होता.

परंतु अलीकडे या योजनेच्या बंद होण्याच्या चर्चेमुळे सर्वसामान्य जनतेत नाराजी व निराशा पसरली आहे. शासनाने अशा लोकहितकारी योजना बंद न करता त्या अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, अशी मागणी माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.


यासंदर्भात माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर्फे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी नांदेड तसेच तहसीलदार माहूर यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनावर तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तसेच नगरसेवक प्रतिनिधी रफिक सौदागर, इरफान सय्यद, अफसर अली, आकाश कांबळे, सुमित खडसे, रणधीर पाटील, अमित येवतिकर, राहुल राठोड, इरफान टेलर, आसिफ खान फर्जुल्ला खान, सुनील आडे, ताणू भाई  ऋषी खंदारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून माहूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे रोजगारां आभावी मजुरांवर उपासमारीची पाळी आलेली आहे त्यामुळे आनंदाचा शिधा या दिवाळीत गोरगरिबांसाठी महत्त्वपूर्ण राहणार असल्याने आनंदाचा शिधा योजनेत अन्नधान्याची वाढ करून सदरील योजना चालू ठेवावी अशी मागणी तालुका अध्यक्ष मेघराज जाधव नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे सह मान्यवरांनी केली आहे

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा