Ticker

6/recent/ticker-posts

ओला दुष्काळ जाहीर करून राज्यातील विद्यार्थ्यांचे सरसकट शुल्क माफ करा- एस एफ आय माहूर चे निवेदन

  


श्रीक्षेत्र माहूर 


मागील दोन  महिन्यापासून सुरू


असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषता ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे शेतमजूर कष्टकरी  शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून राज्यातील विद्यार्थ्यांचे सरसकट शुल्क माफ करावे अशी मागणी एस एफ आय माहूरच्या वतीने दि 3 रोजी तहसीलदार माहूर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे


शेतातील पीक हाताबाहेर गेल्याने  राज्यातील मराठवाडा विभागातील जनतेने  दुष्काळाचा भयंकर तडाखा बसला आहे. यापूर्वी सुद्धा मराठवाड्यातील दुष्काळामुळे विद्यार्थी शैक्षणिक समस्यांना सामोरे जात होते.आणि आता  भिषण पुरपरिस्थितीमुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळित झाले असुन हजारो कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे . या आपत्तीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. तो त्या भागांतील गरीब व मध्मवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि हि परिस्थिती विद्यार्थ्यांचा शैक्षणीक भविष्यावर गदा आणणारी आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ नये.याकरिता शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयांना आदेश देण्यात यावा की पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून कुठलेही शैक्षणिक शुल्क वसुली केल्या जाणार नाही. सदर परिस्थितीमध्ये शासनाने विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून राज्यातील शालेय व पारंपरिक व तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांच्या सरसकट शुल्क माफीसाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन एस एफ आय एस एफ आय च्या वतीने करण्यात येत आहे. जर कुठल्याही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्काकरिता सक्ती किंवा विद्यार्थ्यांवर दबाव टाकून वसुली करणे असे प्रकार घडल्यास एस एफ आय आक्रमक पाऊल उचलेल.

ह्या वेळी एस एफ आय माहूर तालुका निमंत्रक श्रेजल देवपूलवार, गोपाल पवार,अजिंक्य पोटगंटवार,आनंद केंद्रे उपस्तित होते. यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या वतीने नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी निवेदन स्वीकारले

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा