Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ किसान ब्रिगेडचे जिल्हा संघटक अविनाश टनमने यांचे प्रतिपादन

 


श्रीक्षेत्र माहूर| विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन देऊन नऊ महिने होऊन ही दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप दाखविले नसल्याने शेतकऱ्याबाबत सहानुभूती दाखवीत अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले हे कारण पुरेसे असल्याने संपूर्ण कर्जमाफी करण्याची योग्य वेळ आल्याने तत्काळ कर्जमाफीची घोषणा करावी असे मागणी वजा प्रतिपादन किसान ब्रिगेडचे जिल्हा संघटक अविनाश टनमने यांनी केले आहे

             


  केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शेती कृषी हा विषय राज्य सरकारच्या सूचीमध्ये समाविष्ट असल्याने विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत लक्षात घेऊन भारतीय रिझर्व बॅंक यांच्या सूचनेनुसार राज्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यानुसार राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी करण्यास हरकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ केल्यास आर्थिक संकट टळू शकते आणि बँकांची विचारणा थांबू शकते यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कौटुंबिक आर्थिक नैराश्य दूर होऊन शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ शकतो असे महाराष्ट्र राज्य किसान ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष लोकनायक प्रकाश पोहरे यांनी वेळोवेळी राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.

      राज्यात अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होत नसेल तर विद्यमान  सरकार चालविणारे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना शेतकरी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जाब विचारणार असल्याचे प्रत्येक गाव खेड्यात चावडीवर चर्चा होत आहे. शेतकऱ्यांना फसविणारे आणि निवडणुकीत आश्वासन देऊन पळ काढणारे कोण याबाबत तुफान चर्चा होत आहे प्रत्येक गावात किसान ब्रिगेड शेतकरी ध्येय धोरणाबाबत चर्चा मार्गदर्शन आणि प्रकाश पोहरे यांचे शेतकरी आक्रोश,प्रहार, अग्रलेख, स्तंभलेखन यावर चिंतन मंथन होत आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता पूर्वी संपूर्ण पिक कर्ज माफी देऊन सरकारचा शब्द पूर्ण करण्याची ही योग्य वेळ असल्याचे किसान ब्रिगेड चे जिल्हा संघटक अविनाश टनमने यांच्यासह आगाखान पठाण, प्रवीण मार्कड, संदीप टनमने, जियाखान फारुकी, सतीश चौधरी, चेतन महले, दीपक पाटील, अविनाश पवार, राजू शेंडे, निकेतन कुटे, राजेश टनमने, प्रवीण गावंडे, सुधाकर निलेवाड,गजानन टनमने, विलास राठोड, दत्ता महाराज निलेवाड, नरेंद्र पाटील, संतोष हिंगाडे, शंकर चव्हाण, अविनाश डुकरे, धम्मदीप  खिल्लारे, विजय चव्हाण, आसिफ बेग, पंजाबराव भुमरे, युसूफ भाई यांच्यासह असंख्य शेतकरी बांधवांनी योग्य वेळ आल्याने कर्जमाफीची मागणी केली आहे.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा