श्रीक्षेत्र माहूर |मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याची शेती आणि संसार पाण्यात वाहून गेला.शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात विभागीय आयुक्तालयावर विराट हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे.
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना सरकारला शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी याचे भान राहिले नसल्याने किनवट मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड जिल्हासंपर्कप्रमुख बबन थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन तहसील कार्यलय किनवट येथे दि 8 रोजी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी ढोल बजावो आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व शेतकरी बांधवानी उपस्थित राहण्याचे आव्हान शिवसेना विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल, उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव,किनवट तालुकाप्रमुख मारुती दिवसे पाटील,माहूर तालुकाप्रमुख जितू चोले यांनी केले आहे.
