Ticker

6/recent/ticker-posts

पाचुंदा ता. माहूर येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

 


श्रीक्षेत्र माहूर

माहुर तालुक्यातील पाचुंदा येथील शेतकरी गौतम किशन पाटील वय 40 वर्ष यांनी कर्जबाजारीपणा व नापीकला कंटाळून राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्याने त्यांना किनवटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि 10 रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे 


माहूर तालुक्यातील मौजे पाचुंदा येथील गौतम पाटील हे अल्पभूधारक शेतकरी होते मागील अनेक वर्षापासून शेतात नापिकी व कर्जबाजारीपणा झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा या विचारात ते मागील अनेक दिवसापासून सतत चिंताग्रस्त होते दि 10/10/ 2025 रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान पाचुंदा येथील राहते घरी शेतकरी गौतम किशन पाटील यांनी विष पिल्याचे नातेवाईकाना कळताच त्यांना किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा मुलगा वैदिक गौतम पाटील यांनी किनवटच्या पोलीस ठाण्यात अर्ज देऊन घटना कळविली 

 त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार असून अल्पभूधारक शेतकरी असल्याने पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी माहूर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून आणखी आत्महत्या होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन मयत शेतकऱ्यांच्या वारसांना तात्काळ शासकीय मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा