ट्रामा केअर सेंटर ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे बस स्थानक मराविम कार्यालय ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत अद्यावत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची निवेदनाद्वारे माजी नगरसेवक पत्रकार इलियास बावाणी यांची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आमदार भीमराव केराम यांच्याकडे मागणी
श्रीक्षेत्र माहूर
माहूर शहर सर्वधर्मीय देवस्थानचे शहर असून तालुक्यातील शेतजमीन कोरडवाहू असल्याने दरवर्षी हजारो नागरिक रोजगारासाठी परप्रांतात स्थलांतर करतात तसेच माहूर शहरात भाविक लाखोच्या संख्येने येत आहेत तसेच येणारे भाविक आणि तालुक्यातील नागरिकांच्या अपघातांचे प्रमाण वाढल्याने माहूर शहरात ट्रामा केअर सेंटर अद्यावत शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्प आणावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आमदार भीमराव केराम यांचे कडे माजी नगरसेवक पत्रकार इलियास बावाणी यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माहूरला आले असता दि 11 अकरा रोजी निवेदन देऊन केली आहे
माहूर शहरात मूलभूत सुविधा उभाराव्या यासाठी अनेक मान्यवरांनी या आधी पाठपुरावा केलेला आहे स्थानिकांना रोजगार मिळावा भाविकांना माहूर गडावर येण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रो रेल्वेची जलद सुविधा मिळावी आणि अपघातग्रस्तांना माहूर शहरातच तात्काळ सुविधा मिळावी यासाठी ट्रामा केअर सेंटर मंजूर करून सुरू करावे यासाठी पत्रकार इलियास बावाणी यांचा अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे
माहूर तालुक्यातील शेती शिवार हे कोरडवाहू असल्याने उन्हाळ्यात शेतकरी शेतमजूर बेरोजगार रोजगारासाठी परप्रांतात जातात तालुक्यातील अर्धी अधिक खेडी ओस पडतात त्यामुळे मरावीम कंपनी कार्यालय बस स्थानक आणि ग्रामीण रुग्णालयाच्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्याने हजारोंना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल तसेच माहुर गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या घरात गेल्याने त्यांना येण्या-जाण्यासाठी प्रचंड त्रास होत असून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी नागपूर ते यवतमाळ ब्रॉडगेज रेल्वे मंजूर केली आहे ती माहूरपर्यंत वाढवावी जेणेकरून भाविकांना जलद गतीने येऊन दर्शन घेता येईल तसेच तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक 50 किलोमीटर ला ट्रामा केअर सेंटर मंजूर होत आहेत त्या धर्तीवर माहूर शहरातही पाच एकर जागा घेऊन ट्रामा केअर सेंटर उभारावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माहूरगडावर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचप्रमाणे या सुविधा उपलब्ध करून दिल्यास नम नागरिक भाविकांचा त्रास कमी होईल स्थानिकांना रोजगार मिळेल आणि अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळतील त्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे माजी नगरसेवक पत्रकार इलियास बावाणी यांनी केली आहे
