Ticker

6/recent/ticker-posts

खांबात उतरलेला विद्युत प्रवाह लागल्याने म्हैस दगावली लिंबायत येथील चेतन कुमार धनावत यांची म्हैस दगावल्याने दीड लाखाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी।



श्रीक्षेत्र माहूर


माहूर तालुक्यातील मौजे लिंबायत येथील चेतन कुमार धनावत यांचे वडील दि.11/10/2025 रोजी सकाळी 12:00 वा शेतशेजारी असलेले प्रमोद मोरे यांच्या शेतातील बांधावर न्हैस काळ्या रंगाची, शिंगे गोल असलेली, वय 5 वर्षाची किंमत 1,50,000/-रु, असुन यावेळी म्हशीला चारत असतांना म्हैस मराविम कंपनीच्या खांबाला असलेल्या ताराला लागली असता  म्हशीला शॉक लागल्याने ती जागीच मरण पावली


शेतशेजारी असलेल्या इलेक्ट्रीक पोलच्या ताराला करंट उतरल्याने त्या तारेचा शॉक लागून म्हैस मरण पावली आहे, यापुर्वी तारात विद्युत पुरवठा येत असल्याबाबत कर्मचाऱ्यांना कळविले असता त्यांनी दुरुस्त करुन दिले नाही. त्यामुळे म्हशीला विद्युत पुरवठा असलेल्या ताराचा स्पर्श झाल्याने म्हैस दगावली असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मरावीम कंपनीकडे केली आहे


यावेळी तलाठी साहेबराव गावंडे पशुवैद्यकीय विभागाचे डॉ चौधरी मराविम कंपनीचे रामेश्वर जाधव यांनी पंचनामा केला माहूर तालुक्यातील अनेक गावात असलेल्या विद्युत खांबांचे तार लोंबकळणे तारात करंट उतरणे यासह विद्युत पोल वाकलेले असणे किटक्याट नसणे अशा अनेक कारणामुळे वेळोवेळी विद्युत पुरवठा बंद होत असल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहूर तालुक्यातील विद्युत पुरवठा संबंधी समस्या निकाली काढाव्या आणि म्हैस दगावलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयकांत मोरे पाटील यांनी केली आहे

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा