किनवट/प्रतिनिधी: दिनांक 10 ते 17 नोव्हेंबर 2025 नामनिर्देशन अर्ज भरण्याची तारीख होती. आज ती संपली. आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 28 तर नगरसेवक पदासाठी 267 उमेदवारांनी आपले अर्ज किनवट नगरपरिषद येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केले आहेत.
किनवट नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात आज दिवसभर एकच गर्दी उसळली होती.
आज अनेक पक्षाने आपल्या आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म चे वाटप केले व आपले उमेदवार ही जाहीर केले. नोव्हेंबर ची थंडी जशी जशी वाढत आहे तसे तसे किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीला रंग येत आहे.
2 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहेत तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. यापुढे छाननी व उमेदवारी अर्ज मागे घेणे असे कार्यक्रम असून त्यानंतर अंतिम उमेदवार जाहीर होतील तेव्हा खरी रंगत सुरू होईल.
