Ticker

6/recent/ticker-posts

मानव विकास मिशन ची बस सुरू करा


पिंटू पाटील वायफनीकर यांची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सह विभाग नियंत्रकाकडे मागणी


श्रीक्षेत्र माहूर


माहूर तालुक्यातील शेलू, गंगाजी नगर, करंजी, मनीरामखेड, लोकरवाडी आणि सिंदखेड गोंडवडसा परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मानव विकास मिशनची बस सुरू नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज लांबचा आणि असुरक्षित प्रवास करावा लागत असून, यामुळे पालकांमध्येही चिंता वाढली असून सदरील कैफियत गावकऱ्यांनी पिंटू पाटील वायफाणीकर यांचे कडे मांडल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी राहुल कर्डिले विभागीय वाहतूक नियंत्रक नांदेड  यांची भेट घेऊन पत्राद्वारे मानव विकास मिशनची बस सुरू करावी अशी मागणी केली आहे


स्थानिक शिवसैनिक पिंटू आशीर्वाद पाटील वायफनीकर यांनी सांगितले की,या मार्गावर बससेवा पूर्णपणे ठप्प असून विद्यार्थ्यांना उशिरा शाळा–महाविद्यालयात पोहोचणे, वाढता वाहतूक खर्च आणि असुरक्षित प्रवास अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावर मानव विकास मिशनच्या बस फेऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे


स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थी यांनीही या प्रश्नाला मोठा पाठिंबा देत बससेवा त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त केली जात असून या मार्गावरून माहूरला शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने काही आघटीत घडण्याआधी तत्काळ मानव विकास मिशनच्या बस फेऱ्या सुरू  कराव्यात अशी मागणी पिंटू पाटील वायफनिकर यांनी सर्व संबंधिताकडे निवेदनाद्वारे केली आहे


पिंटू पाटील वायफनीकर यांच्या मागणीवरून आमदार हेमंत पाटील यांनीही आगारप्रमुख किनवट माहूर आणि विभाग नियंत्रकांना सदरील मार्गावर मानव विकास मिशन ची बस सेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशा आशयाचे पत्र दिले होते परंतु अद्याप बस सुरू झाली नसल्याने विद्यार्थी विद्यार्थिनी गैर सुविधेचा सामना करत आहेत

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा