Ticker

6/recent/ticker-posts

इच्छुक उमेदवार पत्रकार आनंद भालेराव यांना मिळतोय जनतेतून वाढता पाठिंबा..


किनवट/प्रतिनिधी: गोकुंदा पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून अनुसूचित जातीचे राखीव असलेले भावी सभापती पद मिळवण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार नेतेमंडळी ज्याच्या त्यांच्या परीने कामाला लागली आहे.यात इच्छुक उमेदवार पत्रकार आनंद भालेराव यांच्या नावाला जनतेतून पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

             महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीच्या पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार  असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोकुंदा हा गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे एकच जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. तसेच पंचायत समिती सभापती चे आरक्षणही अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे गोकुंदा पंचायत समितीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. गोकुंदा पंचायत समितीची निवडणूक ही अटी त्याची होणार आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार प्रचाराच्या कामात लागलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पत्रकार आनंद भालेराव इच्छुक उमेदवार असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जनतेतून त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. प्रमाणिक मितभाषिक सामाजिक,राजकीय शैक्षणिक सदा कार्यात अग्रेसर असणारे पत्रकार आनंद भालेराव सध्या गोकुंदा गणात  चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्याकडे भावी सभापती म्हणून पाहिल्या जात आहेत. गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात आ. स्व.प्रदीप नाईक व माजी मंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या विविध पदावर राहून गोरगरीब जनतेसाठी कामे केली आहेत. त्यामुळे त्यांचा जनमानसात दांडगा जनसंपर्क आहे. सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.

   आमच्याशी बोलताना ते म्हणाले की "गोकुंदा पंचायत समिती निवडणूक माझ्यासाठी अगदी सोपी असून खुद्द जनताच माझ्या प्रचारांमध्ये सहभागी होऊन माझा प्रचार करतील व मला निवडूनही देतील" यात मला शंका वाटत नाही.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा