नांदेड/प्रतिनिधी:- मुदखेड तालुक्यातील मौजे कोल्हा गावातील शेतमजूर सटवा तुळशीराम गवाले कित्येक दिवसांपासुन शेतमजुरीचे काम करुन आपले व कुटुंबांचे पालन पोषण करत असतात.मागासवर्गीय समाजातील मातंग या जातीचे गरीब व कष्टकरी हे इसम असुन,ते नेहमीच गावातील शेतामध्ये शेतमजुरीचे कामे करुन आपला संसाराचा गाडा हाकत असतात. अशातच मौजे कोल्हा येथील गावातील आरोपी लक्ष्मण काळे यांच्या शेतात मजुरीचे काम केले होते. काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मजुरीचे पैसे मागण्यासाठी शेतात गेले असता,त्या ठिकाणी आरोपी लक्ष्मण गोविंद काळे यांना शेतमजुर सटवा गवाले यांनी,मला मजुरीचे पैसे द्या अशी विनवणी केली.शेतमालक यांनी कशाचे पैसे देऊ तुला म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करत उलट मला बेदम मारहाण केली. अशी फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.सदरील शेतमजुर हे एका पायाने अपंग सुद्धा आहेत.बेदम मारहाण झाल्याने त्यांनी लगेच आपल्या जवळील भ्रमणध्वनी वरुन नातेवाईकाला फोन करुन मला सदर आरोपीने पैसे मागण्याच्या कारणामुळे जातीवर शिविगाळ करुन बेदम मारहाण केल्याचे सांगितले. शेतात लवकर या,असे बोलल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक येऊन त्यांना कसेबसे मुदखेड शहराच्यां ठिकाणी घेऊन आल्यावर त्यांनी लगेच लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख माधवराव गायकवाड यांना सर्व हकीगत भ्रमणध्वनीवर सांगितली. परिस्थितीचे गांभीरे ओळखुन त्यांनी लगेच मुदखेड येथे येऊन सर्व प्रकरणाची शाहनिशा केल्यानंतर या शेत मजुरावर झालेला अन्यायाच्या विषयी तातडीने गुन्हा दाखल करण्यासाठी,त्यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात सटवा गवाले यांना घेऊन तशी रितसर फिर्याद दिल्यानंतर किती तरी वेळानंतर आरोपी लक्ष्मण गोविंद काळे रा.कोल्हा यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये व ईतर गुन्हे
दाखल केले आहे.सध्या मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाजा मधिल शेतमजुर,कामगारवर्ग,सालगडी, यांच्यावर मोठा प्रमाणावर अन्याय अत्याचार,गंभीर मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहेत.या घटनेवर स्थानिक पोलीस स्टेशन कडुन लगेच गंभीर कारवाई करत,आरोपीला अटक होताना दिसुन येत नाही.तसेच भोकर विधानसभा मतदारसंघातील काही स्थानिक लोकप्रतिनिधी अशा घटनेमध्ये आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप करत,राजकीय दबाव आणुन,अशी ॲट्रॉसिटीची विविध प्रकरणे दाबली जात असल्याची सुद्धा प्रतिक्रिया लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माधवराव गायकवाड ढोलउमरीकर यांनी सांगितली आहे.या प्रकरणाचा आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.लोकस्वराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडुन या घटनेमध्ये निष्पक्ष न्याय देण्याची मागणी करुन आरोपीला तात्काळ अटक करावी, अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड कडे लोकशाही मार्गाने आंदोलने केली जाईल,असे यावेळी सांगितले जात आहे.या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दगडु हाके भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धिरज चव्हाण हे करीत आहेत.येणाऱ्या काळात तरी ॲट्रॉसिटी कायद्यातील गंभीर गुन्हेगाराला आरोपीला अटक होईल की नाही याविषयी संशय होतो आहे. यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाची वचक नसल्याने जिल्हात विविध गुन्हेगारी वाढल्याची आकडेवारी दिसुन येत आहे.
