Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस पाटलांमुळे प्रशासनावरील ताण कमी* *आज १७ डिसेंबर पोलिस पाटील दिन विशेष

 गावगाड्याचा कणा असलेला प्रशासनाचा दुत


 


*आज ५० पोलीस पाटील दिन राज्यात साजरा होत आहे.*

*न्यूज नेटवर्क

मुखेड : राज्यातील महसुली गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले आहे. गावातील नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असतात. स्थानिक पातळीवर प्रशासनाची जबाबदारी पार पाडताना त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. शिवाय पोलीस पाटलांमुळे पोलिस व महसूल प्रशासनावरील अतिरिक्त काम कमी होत आहे.

दि.१७ डिसेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील अधिनियमास तत्कालीन राज्यपालांनी मंजुरी दिली. त्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून *१७ डिसेंबर हा "पोलीस पाटील दिन"* म्हणून साजरा केला जातो.

 *@यावर्षी राज्यात ५० वा पोलिस पाटील दिन साजरा होत आहे.* 


पोलिस पाटील दिन केवळ कौतुकापुरता मर्यादित न ठेवता, या पदाचे महत्त्व अधोरेखित करून त्यावर सकारात्मक चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर संबंधित पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटलांना मार्गदर्शन करणे,त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेणे, वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेणे गरजेचे आहे.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड