श्रीक्षेत्र माहूर
व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अनिलजी मस्के जिल्हाध्यक्ष गणेशजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉइस मिडीयाचे जिल्हा उपाध्यक्ष विजयजी आमले यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी पत्रकार इलियास बावाणी यांची दि 7 ,11, 2025 रोजी बिनविरोध निवड केली
माहूर शहरासह तालुका भरात पत्रकार इलियास बावाणी यांनी आपल्या लेखणीमुळे वेळोवेळी आवाज उठून विविध विकासकामे पार पाडण्यास मोलाची कामगिरी बजावलेली आहे नगरसेवक पदावर असताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावत शहरात स्वच्छता अभियानाला मान्यवरांच्या सहकार्याने गती देत महास्वच्छता अभियानाचे रूप देऊन माहूर शहराला नावलौकिक मिळवून दिले होते तसेच आपल्या सडेतोड लेखणीतून दृष्ट प्रकारांना आळा घालण्याचे काम सतत 25 वर्षांपासून सेवाभावाने पत्रकारितेच्या माध्यमातून करत आहेत
व्हॉइस ऑफ मीडियाच्या वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन व्हाईस ऑफ मीडियाच्या माहूर तालुकाध्यक्षपदी पत्रकार इलियास बावाणी यांची निवड केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे व्हाईस ऑफ मीडियाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी निवड करताना व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले जेष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे नंदकुमार जोशी सर सचिन बेहेरे गजानन कुलकर्णी संजय बनसोडे निखिल कोरडे सादिक भाई किरमाणी शेख रफिक भाई निलेश जयस्वाल वसंतराव राठोड दत्ता जाधव यांचे सह मान्यवर उपस्थित होते

